top of page
67146235_2380314978725860_7664413815961812992_n.jpeg

सांस्कृतिक कार्यक्रम

आमच्या पूर्व-प्राथमिक शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मुलांना विविध संस्कृतींचे आणि परंपरांचे अनुभव मिळतात. नृत्य आणि संगीत वर्ग, कला आणि हस्तकला कार्यशाळा, भाषा आणि गोष्टी सांगणारे सत्र, सांस्कृतिक उत्सव आणि पाककला वर्ग या कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये सर्जनशीलता वाढते आणि सांस्कृतिक जाणिवा विकसित होतात. या कार्यक्रमांतर्गत मुलांना जगभरातील परंपरांचा अनुभव घेता येतो आणि विविधतेचा सन्मान करण्याची प्रेरणा मिळते.

शिवजयंती उत्सव

आपले थोर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. हा दिवस त्यांचा वारसा, शौर्य आणि भारतीय इतिहासातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. आपल्या माऊली लार्निंग सेंटर मध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमांद्वारे, मुलांमध्ये धैर्य, नेतृत्व आणि आपल्या वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.

होळी उत्सव

संस्कारातून आणि प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण ह्यातून नवीन पिढी घडविणे ह्या साठी प्रत्येक गोष्ट ही कृतीतून व त्याचे शास्त्रीय दृष्टीने महत्त्व (अंधश्रद्धा बाजूला ठेवून) पटवून देण्यासाठी माऊली ॲक्टिव्हीटी सेंटर नेहमी प्रयत्न करत असते.

होळी हा भारतीय सण साजरा करताना त्याचे महत्त्व आणि मुलांकडूनच त्याचे नियोजन करून प्रत्यक्ष कृतीत उतरवायचा प्रयत्न काल सेंटर मध्ये केला गेला.

मुलांचे एकत्र येऊन नियोजन करणे मग ते पान फुले गोळा करण्याचे रांगोळी काढण्याची का होईना पण एकत्र येऊन ते करणं, आणि प्रत्यक्ष कृतीत आणण.

असे छोटेसे कृतीतून संस्कार देण्याचा प्रयत्न काल केला.

आपले,

माऊली लार्निंग सेंटर.

महाशिवरात्री उत्सव

संस्कार हे कृतीतून अनुभवातून घडत असतात.

आज त्याचाच एक भाग म्हणून आपल्या कडे महाशिवरात्र निमित्त महादेवाच्या पिंडीची पूजा करण्यात आली.

हे सर्व केंद्रातील मुलांनी केलं मग त्यात माती बारीक करून घेणे,पाण्यात भिजवून ओली करून घेणे, त्या मातीला आकार देणे, पूजेसाठी झाडाची फुले गोळा करणे,त्या फुलांची मांडणी करणे, गाईच्या गोवऱ्या ची चूल करून प्रसादासाठी दूध गरम करणे,आरती करणे.

हे सर्व मुलांनी आनंदाने केलं. मुलांना प्रश्न पडतात त्याला उत्तर देण्याचे माध्यम म्हणजे आपण त्यांच्याबरोबर बसून त्या गोष्टी करणे आणि करता करता त्यांच्याकडून करून घेणे.

अश्याच छोट्या छोट्या माध्यमातून संस्कार आणि मुलांची जडण घडण ह्यावर माऊली ॲक्टिव्हिटी सेंटर कार्य करत असते.

आषाढी एकादशी

जय जय विठोबा रखुमाई...

माऊली ... माऊली... च्या जय घोषात 'माऊली प्रि स्कूलने' आपल्या लहान वारकर्‍यांच्या सोबत पालखी सोहळा साजरा केला. आपल्या संस्कृतीतील महत्वाचा क्षण म्हणजे हि वारी ह्याची ओळख आज आमच्या चिमुकल्यांना करून देण्यात आली. ज्ञानशारदा संकुलातील ज्ञानेश्वर महाराज मंदिरापासून माऊली प्रि स्कूल पर्यंत पायी वारी चा अनुभव आमच्या वारकर्‍यांनी अनुभवला.

37544478_596118594122980_1451849763824599040_n.jpeg
bottom of page